उस्मानाबाद /प्रतिनिधी - महाराष्ट्र ज्युदो संघटना आणि कोल्हापूर जिल्हा ज्युदो संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथे  झालेल्या ज्युनिअर वयोगटातील राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत दि उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट ज्युदो असोसिएशन चे ज्युदोपटू प्रसाद निंबाळकर आणि ओंकार चौरे यांनी कास्य पदक पटकाविले आहे.

९ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत १०० कि लो खालील वजनी गटात प्रसाद निंबाळकर याने व १०० कि लो पुढील वजनी गटात ओंकार चौरे याने कास्य पदक पटकाविले असून स्पर्धेदरम्यान उस्मानाबाद जिल्हा टिम कोच म्हणून बालाजी चव्हाण याने तर टिम मॅनेजर म्हणून आदर्श तापकिरे यांनी काम पहिले आहे. पदक विजेत्या ज्युदो पटून दि उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट ज्युदो संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव तथा जिल्हा तांत्रिक समिती प्रमुख अशोक जंगमे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, स्पर्धा विभाग प्रमुख प्रताप राठोड आणि जिल्हा तांत्रिक समिती सचिव तथा प्रशिक्षक कैलास लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

 
Top