उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, भाजिविक्रेत्यांची रोडवरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, शहरांमध्ये मुताऱ्यांची सोय करून नागरिकांची इज्जत वाचवावी अशी मागणी फूक संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्याकडे दि. १२ डिसेंबर रोजी केली आहे.

उस्मानाबाद शहरात कोरोना काळामधे व डायट कॉलेज ज्ञानेश्वर मंदिरासमोर भाजी मार्केट बसली आहे. सुरुवातीच्या काळात हे लोक डांबरी रोडपासून योग्य अंतर ठेवून भाजी स्टॉल्स मांडायची. परंतू मागील वर्षापासून त्यांनी चक्क डांबरी रोडपर्यंत व रोडवरही अतिक्रमण केले आहे. त्यामूळे भाजी खरेदीदारास पूर्ण रोडवर थांबून भाजी घ्यावी लागते. त्यामूळे वहातुकीस अडथळा होवून अपघात होत आहेत. तर डायट कॉलेज समोर तर दिवसभर सायकलीवर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. या अतिक्रमणामुळे त्यांच्या जिवितास धोका त्यांच्या निर्माण झाला आहे. त्यामुळे ती अतिक्रमणे हटविण्यात यावीत अशी मागणी केली आहे. यावरअध्यक्ष एम. डी. देशमुख, सचिव धर्मवीर कदम, उपाध्यक्ष मुकेश नायगावकर, सहसचिव गणेश वाघमारे, कोषाध्यक्ष रंगनाथ भोसले, शंकर खुणे, बाबासाहेब बनसोडे, विश्वनाथ पाटील, सुधाकर माळाळे, राजाभाऊ माळी, यु.व्ही. माने, अब्दुल लतीफ, वाय. के. पठाण, लक्ष्मणराव धाकतोडे, सहदेव नागमोडे, बब्रुवान आदलापुरे , अॅड.    एस.आर. यावलकर आदींच्या सह्या आहेत.

 
Top