तुळजापूर / प्रतिनिधी-,

 महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या रितेश देशमुख-जिनिलीया या सिनेक्षेञातील जोडीने  श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवातील  पहिल्या   माळे दिवशी तिर्थक्षेञी  येवुन देविदर्शन घेवुन वेड चिञपटाला यश मिळु दे असे साकडे  घातले.

 कलाविश्वातील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख ‘वेड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्य पावण नगरीत आले. जिनिलीयांचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून रितेशही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात  पहिले पाऊल टाकले आहे.

 चित्रपटसृष्टीतील त्याच्या या  नव्या इनिंगला त्यांनी देविदर्शन घेऊन सुरुवात केली. 

 देविदर्शनानंतर येथील जवाहार सिनेमागेहात प्रर्दशित केलेल्या  ‘वेड’ चिञपट  निमित्ताने रितेश-जिनिलीयाने जवाहर सिनेमाग्रहात जावुन रसिकांन समावेत वेड सिनेमा पाहिला. 

 मी आयुष्यात जे नव्याने करतो तेव्हा प्रथम देविदर्शन घेवुन करतो या पार्श्वभूमीवर मी येवुन आज   देविदर्शन घेतले देविचा  आशिर्वाद घेतला तुम्ही हा मराठी चिञपट थिऐटर मध्ये जावुन बघा असे यावेळी रसिकांना आवाहन केले.

 मराठीत काम करण्याची इछा रितेश ने या  वेड चिञपटात मला संधी देवुन इच्छा पुर्ण केली,असे यावेळी सिनेअभिनेञी जेनेलिया .यांनी सांगितले   कलाक्षेञातील या रितेश व जिनिलिया या जोडीला पाहण्यासाठी मंदीरात व जवाहार थिऐटर व परिसरात रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. 

 
Top