वाशी / प्रतिनिधी-

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी उस्मानाबाद द्वारा आयोजित दि.25/12/2022 रोजी तुळजापूर येथे झालेल्या जिल्हास्तर शालेय  सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी च्या मुलींनी उत्कृष्ठ  कामगिरी केलली व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. 

यामध्ये जवाहर आश्रम शाळा बावी व श्री कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूर सोबत विजय  मिळविला तेव्हा कु. संचिता  ढेपे हिने पिचींग तर ऋतुजा पिसाळ हिने कॅचिंग केली.कु. पायल आवताडे,सानिका अवताडे,अश्विनी काटवटे यांनीउत्कृष्ट बेस फिल्डींग केली. प्रियंका शिंदे, कोमल  डोरले, ईश्वरी शेरकर, चेडे देवयानी  यांनी  उत्कृष्ट  क्षेत्र रक्षण केले. तसेच या स्पर्धेत मुलांनीही भाग घेतला व उपविजेते ठरले. या  यशाबद्दल महाविद्यालयाचे वतीने प्राचार्य डॉ. रवींद्र कठारे, क्रीडा शिक्षक श्री शशिकांत सरवदे, डाॕॅ. दैवाशाला रसाळ, सर्व  प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी  खेळाडूंचे अभिनंदन  केले. व लातूर विभाग स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top