उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने हिवाळी अधिवेशन नागपुर येथे राज्यातील पोलीस पाटील यांच्या न्याय हक्कासाठी २२ डिसेंबर रोजी विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे तुळजापूर-उस्मानाबाद रोडलगत निसर्ग गारवा हॉटेल येथे रविवारी दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारी १:०० वाजता मराठवाडा स्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण सांळूखे पाटील, राज्य संघटक बळवंत काळे पाटील, सह सचिव टेमकर पाटील, राज्य निमंञक भिसे पाटील, विभागीय अध्यक्ष जब्बार पटेल, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा काळभोर पाटील, विभागीय कार्यकारी अध्यक्ष राहुल वाकुरे पाटील, विभागीय सचिव भालेराव पाटील, विभागीय संघटक सपाटे पाटील, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी महिला पदाधिकार्यांसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष हणमंत देवकते पाटील यांच्या नियोजनाखाली करण्यात आले होते.
यांच्या झाल्या नियुक्त्या
पोलीस पाटील संघ महिला आघाडी सदस्य स्वामी, तुळजापुर तालुका महिला आघाडी अध्यक्ष रेखा हांडगे, राज्य संपर्क प्रमुख म्हणून बालाजी खरात-पाटील यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी त्यांचा राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यांचा केला विशेष सत्कार
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे संपर्कप्रमुख दिनकर पाटील, लोहारा तालुका अध्यक्ष सुर्यकांत पाटील यांचा सेवानिवृत्ती बद्दल व लोहारा तालुक्यातील भोसगा येथील पोलीस पाटील डॉ. ज्योती हत्तरगे यांनी पीएचडी मिळवल्याबद्दल राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.