उस्मानाबाद /प्रतिनिधी-

  जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि उस्मानाबाद जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा पार पडली. यात एकोणीस वर्षांखालील मुलांच्या गटात स्वराज देशमुख याने प्रथम क्रमांक पटकावला.तर सतरा वर्षांखालील मुलांच्या गटात यश हुंडेकरी याने प्रथम, आर्यन भाकरे याने द्वितीय तर मुलींच्या गटातून प्रियंका हंगरगेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. चौदा वर्षाखालील मुलांच्या गटातून सुयश आडे- प्रथम, प्रथमेश अमृतराव-द्वितीय,श्रीयश गायकवाड-तृतीय, तर मुलींच्या गटात गार्गी पलंगे हिने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धा पंच म्हणून प्रमोद गायकवाड आणि शुभम जकाते यांनी काम पाहिले. विजेत्या खेळाडूंची निवड लातूर येथे दिनांक २० व २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन आ.राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,उस्मानाबाद जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष युवराज नळे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, क्रीडा अधिकारी कैलास लटके, नदिम शेख यांनी केले आहे.
 
Top