उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शहरातील महात्मा गांधी नगर येथे कुमार व्यास यांच्या निवासस्थानी प्रतिवर्षा प्रमाणे निवासस्थानी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गीताजयंती निमित्त श्रीमद भागवत गीतेचा व विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करण्यात आला.  प्रारंभी हभप शामराव दहिटणकर यांनी गीतेतील अर्जुन श्रीकृष्ण यांचे संवादातील आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ,कर्मयोग ,भक्ती योग व ज्ञान योगाचे मानवी जीवनात किती आवश्यक आहे हे सांगितले म्हणून गीता धर्मग्रंथ रोज पठण करण्यासाठी सर्वांना आवाहन केले .

कुमार व्यास यांनी आज गीता घरोघरी किती आवश्यक आहे व आपले पुढील पिढीस या ज्ञानाचे हस्तांतरण करण्याची व असे उत्सव वारंवार साजरी करण्याची गरज व्यक्त केली  आर एस कुलकर्णी यांनीही आपले गीता विषयक अनुभव प्रगट केले

कार्यक्रमास ह भ प घाटगे महाराज, नंदकुमार अघोर ,संजय ठाकरे ,डी आर कुलकर्णी ,बंडू जोशी ,बंडू प्रयाग आदी उपस्थित होते एकूण 75 भक्तांनी गीता पाठ केला त्यात महिलांचा समावेश मोठा होता. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

 
Top