उस्मानाबाद (प्रतिनिधी) :-

  उस्मानाबाद जिल्ह्यातील १६५ ग्रामपंचायतसाठी उद्या रविवार दि.१८ डिसेंबर रोजी मतदान होत असून त्यासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले आहे. बॅलेट मशीन, मतपेटी यासह अन्य साहित्य देण्यात आले आहे. कर्मचारी यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी वाहन व्यवस्था व पोलिस बंदोबस्त आज पाठवला जात आहे. त्यासाठी शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांसह एसटी, महामंडळ व खासगी बसेसची गर्दी झाली होती. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ६५८ मतदान केंदावर ३ लाख ६५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील ३९ मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात अली असून २ हजार ७५२ कर्मचारी व ३७ झोनल अधिकारी यांची नेमणूक करण्यात अली आहे.

१६२ सरपंच पदासाठी ८८८ उमेदवार 

उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच पदाच्या १६२ जागांसाठी ८८८ उमेदवार तर सदस्य पदाच्या १ हजार ४३५ जागांसाठी ४ हजार ९६० उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हयातील कांही ग्रामपंचातमधील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध ही आले आहेत. 

पोलिस बंदोबस्तही तैनात

जिल्ह्यातील १६५ ग्रामपंचायतीत १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दरम्यानच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेण्यासाठी पोलिस   प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत पोलिस बंदोबस्त लावला असून   फिरते पथकही नेमण्यात आले. आहे. मतदान शांततेत होण्यासाठी पोलिस व गाव पुढाऱ्यांच्या बैठकी  होत आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी गावातील कार्यकर्त्यांवर   पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

  लोकसभा निवडणुकीप्रमाणे भत्ता द्यावा

लोकसभा विधानसभा प्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मचारी यांना भत्ता द्यावा अशी मागणी कांही शिक्षक संघठनांनी केलेली आहे. निवडणुक प्रशिक्षणाचे दोन दिवस व निवडणुकीचे दोन दिवस याप्रमाणे चार दिवसाचा भत्ता लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांना िमळत असतो. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत भत्ता मिळावा, अशी मागणी केली आहे. आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीचा भत्ता कधीच मिळाला नाही, असे शिक्षक संघटनेने सांगितले आहे. त्याचप्रमाणे दोन िदवस निवडणुकीची ड्यूटी केल्यानंतर एक िदवस सुटी मिळावी याचेही निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. 


 
Top