उस्मानाबाद / प्रतिनिधी-

संभाजी ब्रिगेड संघटनेला 25 वर्षे पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट या ठिकाणी बुधवार दिनांक 28 डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात रौप्य महोत्सवी अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष रोहित बागल, संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते हर्षल बागल, संभाजी ब्रिगेडचे उस्मानाबाद जिल्हाअध्यक्ष शरद पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी प्रवीण गायकवाड म्हणाले कि या अधिवेशनासाठी छत्रपती घराण्यातील प्रमुख लोकांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे त्यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील लोक उद्घाटनास उपस्थित राहतील या अधिवेशनात एकूण तीन सत्रे होणार आहेत पहिल्या सत्रात बहुजन समाजाशी संवाद साधण्यासाठी संवाद बहुजन समाजाशी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एससी एसटी ओबीसी व अल्पसंख्याक समाजाचे राज्यस्तरीय प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे बहुजन समाजाची लोकसंख्या मोठी आहे परंतु या समाजाचे अर्थकारण मात्र कमकुवत असल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत त्यामुळे त्यांचे अर्थकारण सुधारण्याच्या दृष्टीने आरक्षणांकडून अर्थकारणाकडे या विषयावर दुसऱ्या सत्रात तज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे तर तिसऱ्या सत्रात साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे यामध्ये डॅा.आ.ह.साळुंखे, जयसिंगराव पवार व मा.म.देशमुख यांना छत्रपती शाहू महाराज आणि शरद पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा सहसचिव पदी प्रतापसिंह गरड, जिल्हा उपाध्यक्ष पदी बिरंजे सर व तालुकाध्यक्ष पदी भैरव रणखांब यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी विक्रमभैय्या पाटील, रवी निंबाळकर, रमेश यादव, काका देशमुख, गौस मुलानी, विश्वजीत जाधव, विष्णु यमपुरे, ऋषिकेश गुंड ,श्रीनाथ पडवळ, सचिन लाकाळ, आबा पवार, रवी येवले, मनोज सरडे, सचिन चौरे आदीसह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top