उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद पंचायत समितीमधील शोषखड्डे  सहभागी ग्रामसेवक आगळे व सुर्वे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी निलंबित केले आहे तर 3 कंत्राटी कर्मचारी यांना सुनावणीनंतर कायम स्वरूपी सेवेतून निलंबन करुन त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. शोषखड्डे घोटाळ्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार असून पंचायत समितीच्या सर्व कारभाराची विशेष चौकशीची गरज आहे.

 महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बेंबळी येथे शोषखड्डे घोटाळ्यात सहभागी असलेचे आरोपावरून ग्रामसेवक ए व्ही आगळे यांना तर मेडसिंगा येथील ग्रामसेवक एस बी सुर्वे यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश सीईओ गुप्ता यांनी दिले आहेत. निलंबन कालावधीत आगळे यांना तुळजापूर पंचायत समिती तर सुर्वे यांना कळंब पंचायत समिती येथे सल्लग्न करण्यात आले आहे.

 उस्मानाबाद पंचायत समिती येथील तांत्रिक सहायक स्वाती रोहिदास कांबळे, राकेश पांडुरंग सगर व सचिन रामहरी वीर या तिघांची सेवा कायमस्वरूपी संपवण्यात आली असून त्यांचे नाव काळ्या यादीत टाकण्याचे आदेश रोहयो उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार श्रीरंगराव कांबळे यांनी सुनावणी अंती दिले आहेत. या तिघांची सेवा यापूर्वी समाप्त करुन कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्यानंतर त्यांनी खुलासे सादर करीत सुनावणी घेतली व त्यात अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. 

 
Top