नळदुर्ग  / प्रतिनिधी-

 आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतुन नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे मंजुर झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ  भाजपाचे माजी जि. सदस्य ऍड. दीपक आलुरे यांच्या हस्ते मशीनरीची पुजा करून तसेच श्रीफळ फोडुन या कामाचा शुभारंभ करण्यात   आला.

 आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतुन मराठा गल्ली येथे ८ लाख ८५ हजार रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मराठा गल्ली येथील सुहास येडगे यांचे घर ते मचिंद्र जाधव यांच्या नविन घरापर्यंत हा सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे.

 ावेळी नगरसेवक उदय जगदाळे, भाजपाच्या उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुशांत भुमकर,भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, भाजपाचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, संजय विठ्ठल जाधव, उमेश नाईक, सागर हजारे, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार तानाजी जाधव, श्री रजवी, नेताजी किल्लेदार, बाबुराव सुरवसे यांच्यासह मराठा गल्ली येथील नागरीक उपस्थित होते.

 
Top