तुळजापूर /प्रतिनिधी-

2022मध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकविमा भरलेल्या सर्व शेतक-ना पिकविमा रक्कम  तात्काळ द्या , यासह पुरेशा दाबाने वीज पुरवठा करा,  नियमीत कर्ज भरणा-यांना पन्नास हजार तात्काळ द्या, यासह अनेक मागण्यांसाठी तुळजापूर शहरातील बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  वतीने करण्यात आले . यावेळी चार महामार्गावरुन जाणारी वाहतुक ठप्प होऊन वाहनांचा लांबचालांब रांगा लागल्या होत्या .  यावेळी तहसिलदार समोर टमटे रस्त्यावर ओतुन शासनाचा निषेध केला. 

 दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार सौदागर तांदळे यांना रस्ता रोको स्थळी देण्यात आले. आंदोलनात  स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे,उपाध्यक्ष धनाजी पेंदे, तालुकाध्यक्ष दुर्वास भोजणे,  नेताजी जगदाळे,  उत्तम अमृतराव,  सतिश डोके, नरसिंग पाटील ,डाॅ.अनिल धनके, प्रदीप भोजणे, प्रदीप जगदाळे, चंद्रकांत नरोळे , सुशांत गाडे आदीसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. 

 
Top