उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि उस्मानाबाद या बँकेच्या उमरगा शाखेतील खातेदार रविराज गोविंद भोसले रा रामपूर ता उमरगा जि उस्मानाबाद यांचे अकस्मात निधन झाले त्यानंतर बँकेने त्यांच्या पत्नी श्रीमती निर्मला रविराज भोसले रा रामपूर यांना वारसदार पत्नी या नात्याने प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत त्यांच्या पतीच्या आकस्मात निधनानंतर विमा कंपनीकडून वारसास मिळणारी रक्कम रुपये 200000(अक्षरी रुपये दोन लाख मात्र )विमा कंपनीशी वेळोवेळी संपर्क करून त्यांना सदरची रक्कम प्राप्त करून दिली त्यामुळे त्यांनी दिनांक 21 12 22 रोजी प्रत्यक्ष मुख्य कार्यालय उस्मानाबाद येथे येऊन बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंत संभाजीराव नागदे, संचालक प्रदीप काकासाहेब जाधवपाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय श्रीरंग घोडके, सर व्यवस्थापक महादेव बंकटराव गायकवाड व उमरगा शाखेचे शाखाधिकारी कर्मचारी वृंद यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कौतुक करून आभार व्यक्त केले

 
Top