उस्मानाबाद /प्रतिनिधी- 

 मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समितीमार्फत प्रत्येक महिन्याच्या 17तारखेला, दि. 17 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसेनानींच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व हा इतिहास पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज येथे श्री.बुबासाहेब जाधव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी मराठवाडा कसा स्वतंत्र झाला, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती मेहनत करावी लागली, किती त्रास, अन्याय अत्याचार सहन करावे लागले, त्यासाठी झालेले बलिदान अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगून हा इतिहास पुढच्या पिढीला माहिती असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील हे होते तर माजी नगरसेवक सिद्धेश्वर कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना उपमुख्याध्यापक तथा माजी नगरसेवक सिद्धेश्वर कोळी यांनीही हा इतिहास तरुणांपर्यंत पोहचवण्यासाठी महत्वपूर्ण कार्य करत असल्याबद्दल मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समिती च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. प्रारंभी मान्यवरांच्या स्वागत समारंभानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे युवराज नळे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना समितीच्या उपक्रमाबाबत प्रास्ताविक करताना या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील हुतात्मा स्मारक असलेल्या धाराशिव,ईट,देवधानोरा,अपसिंगा,गुंजोटी, उमरगा,मुळज, अणदूर, नळदुर्ग अशा विविध ठिकाणी हुतात्म्यांना फुले वाहून अभिवादन करण्यात आले.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे ॲड कुलदिपसिंह भोसले यांनी तर आभारप्रदर्शन प्रमोद बचाटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  ॲड महेंद्र देशमुख, प्रविण जगताप, राजेंद्र परदेशी, सुरेश शेळके, मदन आबा पवार, राजाभाऊ कारंडे, गुलचंद व्यवहारे, लक्ष्मण माने, गोरक्ष चव्हाण, प्रीतम टेके यांच्या सह अनेक समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम केले.

 
Top