लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील दुकान क्रं.2 चे दुकानदार वैजिनाथ माणिकशेटटी व दुकान क्रं.3 चे दुकानदार इनुस पटेल यांच्या दुकानाला आयएसओ मानांकन मिळाले असुन यांचा दि.27 डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हा अधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे व जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, नायब तहसीलदार राजाराम केलुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दुकानदारांनी आपल्या दुकानात विविध प्रकारचे माहिती देणारे फलक व दुकानाचे रेकारड, स्टॉक रजिस्टर, सिसीटिव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्र, स्वच्छता आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या मुलभूत सुविधा व विविध प्रकारचे परवाने देणे आदिंची पूर्तता केल्याने त्यांना आयएसओ नामांकन देण्यात आले आहे.


 
Top