तेर  / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( पेठ ) मधील खेळाडूंनी बीट स्तरीय मैदानी स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत आपले वर्चस्व कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे शाळेतील २२ खेळाडूंची तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली असून निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे .

 जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रांतही जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलींचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने बीट स्तरावर  विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार तेर ता उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( पेठ ) येथील मैदानावर दिनांक २६ ते २७ डिसेंबर या कालावधीत बीट स्तरीय शालेय मैदानी व कुस्ती , योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेत तेर व काजळा बीट मधील जवळपास १६ शाळांनी स्पर्धेत सहभाग  नोंदविला होता. विशेष म्हणजे तेर ता. उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक पेठ शाळेतील पल्लवी माने अर्जून नारे  , अक्षरा अष्टेकर  , दुर्गा गडदे  , अविनाश इंगळे  , महेश सलगर , पूर्वा गडदे , समृद्धी आंधळे , समृद्धी माने  , समृद्धी माने  , पल्लवी माने , अमर कोळी  , सार्थक रामगुडे , पल्लवी माने , श्रावणी टेळे  , अक्षरा अष्टेकर  कुस्ती स्पर्धेत आदर्श पांढरे  , अंश पांढरे  , अमर कोळी  , हर्षदा सुर्यवंशी  , अंकिता पडुळकर , बॅटन रिले ४ × १०० सांघिक क्रीडा प्रकारात मुलांमध्ये अर्जून नारे , अविनाश इंगळे , विशाल कदम , महेश सलगर  , मुलींमध्ये पल्लवी माने , गौरी क्षिरगीरे  , प्रज्ञा नागरगोजे , अक्षरा अष्टेकर  , नंदिनी पाडुळे , वैभवी शेळके , दुर्गा गडदे , प्रणिता जाधव आदि खेळाडूंनी बीट स्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपले वर्चस्व कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे .यावेळी या यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , सहशिक्षक गोरोबा पाडुळे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सर्व यशस्वी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांचा मुख्याध्यापक विक्रम खडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी मुख्याध्यापक विक्रम खडके  , गोरोबा पाडुळे  , गणपती यरकळ  , श्रीमती वर्षा शेजाळ , देशमुख शशिकांत , चौरे गोरख , नाईक उषा , मुंढे प्रभाताई , हलसीकर रोहिणी , बंडगर लता , पांचाळ शकुंतला , आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top