उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा क्रीडा कार्यालय  विभागाच्यावतीने  दि. १६.१२.२०२२ ते १९.१२.२०२२दरम्यान स्व.के.टी पाटील क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या.

 या स्पर्धेमध्ये प्रशालेचे १४ / १७ / १९ वर्ष वयोगटातील मुले व १९ वर्ष वयोगटातील मुलीच्या संघाने विरोधी संघाला धूळ चारत जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला .  या स्पर्धेत श्रीपतराव भोसले हायस्कूलने सलग पाच वर्ष यशाची परंपरा अखंडित राखली .     विजयी संघास स्पर्धा प्रमुख  विक्रम सांडसे, इंद्रजित वाले , सुमित राठोड , प्रसेनजीत गंगावणे , शशांक जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

   या  विजयी संघाचे संस्थाध्यक्ष सुधीर पाटील , संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील , प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील प्रशालेचे प्राचार्य देशमुख एस.एस. व उपप्राचार्य घार्गे एस. के , उपमुख्याध्यापक  कोळी एस.बी, पर्यवेक्षक इंगळे वाय . के , जाधव आर.बी ,  गायकवाड के. वाय , देशमुख डी. ए , शेटे टी.पी , सौ. गुंड बी.बी यांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top