उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वर्षानुवर्षे भंगार स्थितीत पडलेल्या शासकीय मालमत्तेचे संरक्षण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारींना निवेदन देऊन केली आहे. 

 शासकीय भूखंड असेल या शासकीय मोटार गाड्या व इतर फर्निचर वर्षानुवर्षे भंगार स्थितीत असुन त्याचे ज्या त्या वेळी नियोजन केले पाहिजे.तहसिल कार्यालयात असेच बंद गाड्या उभ्या असुन त्या गाडीच्या अवती भवती झाडे झुडुपांनी विळखा टाकला आहे.असे अनेक शासकीय कार्यालये आहेत की अशी परिस्थिती आपणाला पाहण्यास मिळते.तसेच शासकीय अधिकारी यांचीही काहि निवासस्थान आहेत की निवासे पडीक असुन जागा कचरामय झाली आहेत.अशा जागेवरती अतिक्रमण होण्यास उशीर लागत नाही.गरज राहिल वास्तवतेची प्रशासनाने भंगार स्थितीत पडलेल्या वस्तुंचा वेळीच बंदोबस्त करुन राष्ट्राच्या संपत्तीचा योग्य वापर करावा.कारण हि सर्व राष्ट्रीय संपत्ती असुन त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे अशा प्रकारचे लेखी निवेदन नायाब तहसिलदार मैदर्गी मॅडम यांच्या मार्फत जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांना सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी चर्चा करुन दिले.

 
Top