उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यात धाराशिव लेणी तेर येथील बौद्ध स्तूप सहित इतर स्थळांचा विकासासाठी उल्लेख करण्यात यावा सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे  यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकास आराखड्यात एकूण नऊ ते दहा धार्मिक स्थळांचा विकासासाठी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिनांक 14 /10/ 2022 रोजीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने निर्देश दिले होते याला अनुसरून उस्मानाबाद येथील धाराशिव लेणी ते येथील ऐतिहासिक असे उत्खननातील सापडलेले बौद्ध स्तूप,त्रिविक्रम मंदिर, तुळजापूर येथील मातंगी मंदिर,उस्मानाबाद येथील ख्वाजा शमशोद्दीन गाजी दर्गा,गड देवदरी येथील शेख फरीद दर्गा,काटी सावरगाव येथील जामा मज्जिद व जैन मंदिर या स्थळांचा विकास आराखड्यात समावेश असणे गरजेचे आहे कारण हे स्थळे उस्मानाबाद जिल्ह्याला लाभलेली अनमोल अशी देणगी होय. पर्यटनाच्या विकास आराखड्यात या धार्मिक ऐतिहासिक स्थळांचा समावेश करून विकास झाला पाहिजे.प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यात वरील पर्यटन स्थळाचा समावेश करून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सहकार्य करावे अशा प्रकारचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना नायाब तहसिलदार मैदर्गी मॅडम यांच्या मार्फत चर्चा करून सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी दिले.

 
Top