उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीला मध्य रेल्वेने अखेर मूर्त रूप दिले आहे. उस्मानाबादहून थेट तिरुपतीसाठी नवीन रेल्वेगाडी सुरू होणार आहे. मुंबईसाठीही (कुर्ला-एलटीटी)आणखी एक गाडी उपलब्ध झाली असून, प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला तर या दोन्ही साप्ताहिक गाड्या नियमित होण्याची शक्यता आहे. म

मध्ये रेल्वेने याबाबतची घोषणा केली असून या दोन्ही साप्ताहिक गाड्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. तिरुपतीसाठी सोलापूरहून विशेष रेल्वे सोडली जाणार आहे. ही गाडी कुर्डुवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, उदगीर, भालकी, बिदर, हुमनाबाद, गुलबर्गा, वाडी, रायचूर, गुंटकर, रेनीगुंटामार्गे तिरुपतीला जाणार आहे. ही गाडी सोलापुरातून (क्र. ०१४३७) दर गुरुवारी रात्री पावणेदहाला निघणार आहे. ती उस्मानाबादेत मध्यरात्री १ वाजता येईल.सोलापुरात ही गाडी रात्री सव्वासातला पोहोचेल. मुंबईसाठी (लोकमान्य टिळक टर्मिनस) नवीन गाडी सुरू होणार आहे. सोलापूरहून मंगळवारी सकाळी सव्वानऊला ही गाडी (क्र. ०१४३५) गाडी निघेल. ती गुलबर्गा, बिदर, लातूररोडमार्गे सायंकाळी साडेपाचला लातुरात येईल. ६ वाजून ५५ मिनिटांनी उस्मानाबादेत ही गाडी येईल, पुढे ती वार्शी, कुर्डुवाडीमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे पहाटे पावणेचारला पोहोचेल. परतीचा प्रवास दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुरु होईल.ही गाडी (क्र. ०१४३६) पनवेल, पुणे, कुर्डुवाडीमार्गे उस्मानाबादेत रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी तर लातुरात ११ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. पुढे ती बिदर, गुलबर्गामार्गे गुरुवारी सकाळी सव्वानऊला सोलापुरात पोहोचेल.

 
Top