उस्मानाबाद / प्रतिनिधी-
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा दुरुस्ती व लिंगायत समाजाला अल्पसंख्यांक दर्जा द्यावा अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या 10 व्या सत्राच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान केली.
दि. 14 डिसेंबर 2022 रोजी लोकसभेच्या 10 व्या सत्राच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शून्य प्रहरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याकरीता 50 % ची आरक्षण मर्यादा वाढवणे गरजेचे असून यामुळे इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देता येईल अशी कायदे दुरुस्ती करावी त्यामुळे विकासापासून दुर असणाऱ्या मराठा समाजास न्याय मिळेल तसेच महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा. कायदा दुरुस्ती करुन मराठा समाजास आरक्षण मर्यादा वाढवावी व 12 व्या शतकातील महान संत समाजसुधारक कवी असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केली हा लिंगायत समाज महाराष्ट्र व शेजारील कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळुन येतो. स्वतंत्रपुर्व काळात लिंगायत समाज हा अल्पसंख्यांक असल्याचे तत्कालीन सरकारी कागदपत्रांतील नोंद उपलब्ध आहे. मागील अनेक वर्षापासून या समाजाने अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तरी अद्याप लिंगायत समाजास अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळालेला नाही. आज रोजी महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील 7 टक्के लोकसंख्या ही लिंगायत धर्माचे आचरण व पालन करणारी आहे. अल्पसंख्यांक म्हणून हा समाज घटनात्मक सवलती पासून वंचित आहे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा देणे आवश्यक आहे. या समाजास लिंगायत धर्म म्हणून मान्यता मिळाली तर सांस्कृतिक आणि औद्योगिक विकासासाठी या समाजाला मदत होईल इतर अल्पसंख्यांक समाजाप्रमाणे याही समाजास अल्पसंख्यांकाचा दर्जा दिल्यास या समाजाचा उत्कर्ष होण्यास मदत मिळेल असे प्रतिपादन धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज अधिवेशनाच्या शुन्य प्रहारात लोकसभेमध्ये केले.