परंडा / प्रतिनिधी -

राज्यपाल भगतसिंग कोशारी व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा शहर मंगळवार दि.13 डिसेंबर रोजी बंद चे आव्हान केले होते .या परंडा शहर बंदला प्रतिसाद देत शहरातील व्यावसायिक व्यापारी यांनी मुख्य बाजारपेठ तसेच परंडा शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.  वंचित बहुजन आघाडी कडून प्रशासनाकडे या दोन्ही राज्यपाल व उच्च शिक्षण मंत्री यांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

 परंडा शहर बंदला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाध्यक्ष माजी सभापती मेघराज दादा पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते,प्रहार जनशक्ती पक्ष,एम आय एम, एकल महिला संघटना,जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रत्नकांत ऊर्फ पापा शिंदे, फकीरा दल, लहू सेना, यशस्विनी सामाजिक अभियान आणि शहरातील सर्व व्यापारी संघटना यांनी या बंदला पाठिंबा दिला.          वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के,उस्मानाबाद जिल्हा प्रवक्ता प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, उस्मानाबाद जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे,तालुका अध्यक्ष तानाजी जाधव,परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे,तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे तालुका महासचिव रणधीर मिसाळ डॉ आनंद देडगे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

      सदर निवेदन कु.जेतवनी मिसाळ यांच्या हस्ते दिले या प्रसंगी परंडा शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गणेश सरवदे, फिरोज तांबोळी,दिपक गायकवाड, अरुण सोनवणे, प्रदिप परीहार सिद्धार्थ सरवदे मधुकर सुखसे सागर बनसोडे सतिश बनसोडे बाबा बनसोडे आश्रु वाघचौरे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी तसेच अनेक संस्था संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top