उमरगा/ प्रतिनिधी-

३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर गोवा बनावटी दारुची राजरोस पणे विक्री करणाऱ्या आरोपीच्या  घरातून जप्त करत एक लाख ६३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन कारवाई करून एका आरोपीस अटक करण्यात आली ही कारवाई शुक्रवारी (दि ९) रोजी होळी तांड्यावर करण्यात आली.

या बाबतचे वृत्त असे की,लोहारा तालुक्यातील होळी तांड्यात गोवा निर्मित व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या दारूचे वीस बॉक्स तांड्यात असल्याची माहिती पोलिसांना कळाली दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त  विजयजी सुर्यवंशी  संचालक (दक्षता व अंमलबजावणी) सुनिल चव्हाण  औरंगाबाद विभागाचे विभागीय उपआयुक्त पी. एच. पवार यांचे आदेशानुसार व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,  गणेश बारगजे यांचे  मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उमरगा  या कार्यालयाने दि ९ डिसेंबर आरोपीच्या राहते घरी, होळी तांडा, (ता. लोहारा) येथे गोवा निर्मीत व गोवा राज्यात विक्रीस असलेले दारुचे २२ बॉक्स (१०५६ बाटल्या) सह एकुण एक लाख ६३ हजार ,६८० रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केलेला आहे. सदरच्या कारवाईत आरोपी उत्तम माणिक राठोड, वय ५२ वर्षे, रा. होळी तांडा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद यांस अटक करुन त्याचेवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व त्यांना मे. न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सदरच्या कारवाईत  एस. जी. भवड निरीक्षक तुळजापुर,  तानाजी कदम निरीक्षक भप उस्मानाबाद - लातुर, . प्रदीप गोणारकर प्र-निरीक्षक तलमोड,  रघुनाथ कडवे निरीक्षक भप बीड सर्वश्री दुय्यम निरीक्षक चरणसिंग कुंठे, . प्रभाकर कदम, सुमीत चव्हाण, व कर्मचारी राजेंद्रसिंह ठाकुर, विनोद हजारे, झुंबर काळे, अभिजीत भोंगाणे, अविनाश गवंडी, तुषार नेर्लेकर, कोंडींबा देशमुखे,सुरेश वाघमोडे, बालाजी भंडारी, महेश कंकाळ व राजेश गिरी यांचा समावेश आहे


 
Top