तुळजापूर /प्रतिनिधी

  तिर्थक्षेञ तुळजापूरातील श्रीतुळजाभवानी मंदीराचा दोन्ही महाद्वारा समोर गर्दी   दिवशी मोठ्या संख्येने अतिक्रमण होत असल्याने  भाविकांना श्रीतुळजाभवानी मंदीरात जाताना व येताना रविवारी कसरत करावी लागत  होती.  याबद्दल भाविकांन मधुन तीव्र नाराजी वर्तवली जात होती.

रविवारी सुट्टी पार्श्वभूमीवर भाविक मोठ्या संखेने देवीदर्नशनार्थ आले होते. त्यातच मंदीराकडे जाणाऱ्या  रस्त्यावर विशेषता महाद्वारासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते.  यात महाद्वारासमोर दुचाकी , चारचाकी, हातगाडी ,बांगड्या  व  पितळ स्टील  विक्रेते यांनी व्यवसायासाठी दगड पायऱ्या सह मंदीर समोर गर्दी केली.  त्यातच मोकाट जनावरे दगडी पायऱ्या वर ठाण मांडुन बसले होते.तसेच वृध्द महिला परड्या घेवुन येथे बसल्या होत्या.   ही मंडळी येथे थांबल्याने देविदर्शनार्थ जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांना तसेच येथुन मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना अक्षरशा कसरत करीत जावे लागत होते.  मंदीरासमोरुन दुचाकी वाहन नेणे महाकठीण बनले होते.

 पुर्वी गर्दी दिवशी येथील अतिक्रमण नगरपरिषद हटवत, असे परंतु मागील महिन्यापासुन अतिक्रमण हटाव कामात ढिलाईपणा आल्याने याचा ञास भाविक व  नागरिकांना  सहन करावा लागत आहे.


 

 
Top