लोहारा/प्रतिनिधी

लोहारा येथील सदाशिव हिरेमठ संस्थान अखंड शिवनाम सप्ताह चे दि.४ ते ११ डिसेंबर या कालावधीत अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या शिवनाम सप्ताहा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मठात सदाशिव महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. राष्ट्र संत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने सिद्धेश्वर शिवाचार्य  महाराज (लोहारा), निरंजन शिवाचार्य महाराज(औसा), डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज, गंगाधर शिवाचार्य महाराज सातलिंग स्वामी यांच्या सानिध्यात हा सप्ताह संपन्न झाला. यावेळी 

महाराष्ट्रातील प्रसिध्द शिव कीर्तनकारानी किर्तन सेवा दिली. सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांनी भक्ताना दीक्षा दिली. या सप्ताहनिमित्त शहरात कलश दिंडी काढण्यात आली. तर शेवट चे कीर्तन शि.भ.प.शि.भ.प.कुमार सागर स्वामी (लोहारा) यांचे संपन्न  झाले.या सप्ताह हात शहरा सह तालुक्यातील नागरिकांनी कीर्तनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सप्ताह निमित्त अन्नदाते यांच्याकडून महाप्रसाद व अल्पोपहार देण्यात आले.


 
Top