तुळजापुर / प्रतिनिधी-

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या बालाघाट मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांनी दिली आहे.

 सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे  यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन संपन्न होणार असून, उदघाटन समारंभ,परिसंवाद व कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे,या साहित्य संमेलनास राज्यातून मोठ्या संख्येने साहित्यिक उपस्थित राहणार आहेत, समाजाला दिशा देणाऱ्या साहित्यिक,विचारवंतांची वैचारिक मेजवानी आम्हासाठी पर्वणी आहे असे गौरवोध्दगार तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काढले.या संमेलनास मोठया संख्येने साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हि त्यांनी या प्रसंगी केले,

 यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष परमेश्वर पालकर, तुळजापुर तालुका अध्यक्ष अनिल आगलावे,सचिव डॉ.अविनाश ताटे,कार्यवाहक राहुल दुलंगे, साहित्यिक कवी युवराज नळे,आनंद कंदले आदीजण यावेळी उपस्थित होते.


 
Top