परंडा / प्रतिनिधी -

जागतिक एड्स दिन पंधरवडा व ‘आपली एकता आपली समानता ‘ या ब्रीदवाक्यावरून गुरुवार दि.8 रोजी नगर परिषद परंडा येथे मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली , वैद्यकीय अधीक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी व आर पी जी फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली.

नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याची NCD, Hb, एच.आय .व्ही .तपासणी करण्यात आली. यावेळी उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी रवींद्र करपे व  मकरंद वांबुरकर आय सि टी सी,साई सूर्यवंशी, किशोर मुंडे,तानाजी गुंजाळ, इम्रान शेख, सोनल कुक्कडकर, अजय जाधव यांनी न.प.कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली.नगर परिषद कर्मचारी मुनिर जिकरे, महेश कसबे, गजानन पाटील, बालाजी यादव, महेश एकशिंगे, एश्वर्या म्हमाणे, श्रीमंत जाधव यांनी परिश्रम घेतले .”


 
Top