लोहारा/प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत लोहारा तालुक्यातील लोहारा बीट स्तरीय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालेय क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन लोहारा बिटचे शि.वि.अ.सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून क्रिडा स्पर्धा सुरु करण्यात आल्या. या क्रिडा स्पर्धा दिनांक 26 ते 28 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येत आहेत. 

याप्रसंगी गजानन मक्तेदार, मुख्याध्यापक वसंत राठोड, शहाजी जाधव, क्रिडा शिक्षक गोपाळ सुतार, नागनाथ पांढरे, विवेकानंद क्षीरसागर आदी उपस्थित होते. जि.प.प्रा. शाळा मार्डी व जि.प.प्रा.शाळा खेड यांच्यात पहिल्या सामना खेळवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना सुभाष चव्हाण म्हणाले की, शालेय जीवनामध्ये खेळाचे महत्त्व खूप मोठे आहे, कारण सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करत असते. यावेळी लोहारा बिटमधील शिक्षक नितिन वाघमारे, वैजीनाथ पाटील, हणमंत देशमुख, रसूल शेख, शफीक गवंडी, गोविंद जाधव, सचिन भंडारे, यांच्यासह शिक्षकवर्ग व स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्पर्धेचे पंच म्हणून क्रिडा शिक्षक रोहन जगताप, विवेकानंद क्षीरसागर, गोपाळ सुतार यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  भीमाशंकर डोकडे यांनी केले तर आभार मोहन शेवाळे मानले.

 
Top