उस्मानाबाद / प्रतिनिधी-

संसदपटु भारतरत्न स्व.अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा धाराशिवच्या वतीने प्रतिष्ठान भवन राजेबाग या ठिकाणी अटल युवा पर्व उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत अनेक युवा व युवती स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपले वक्तृत्वामधुन विविध विषयाचे सुसंगत मांडणी केली.

 या कार्यकामाची सुरुवात स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन करण्यात आली. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संबोधित करताना सांगितले की धाराशिव जिल्हयाच्या मातीतुनच प्रमोदजी महाजन यांच्या सारख्या प्रतिभावान नेता व वक्ता जन्मला याच मातीतुन भविष्यातील नेता आज सहभाग घेत असलेल्या स्पर्धकांमधून देखील तयार होवु शकतात असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केला.

 त्याच बरोबर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात विचार मांडले की धाराशिव जिल्हयातील युवक व युवतीसाठी त्यांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्याच्या उद्देशाने व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या अनषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव सदैव उपक्रमशिल राहील. या वक्तृत्व स्पधेच्या माध्यमातुन पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना पुढील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. वक्तृत्व स्पर्धेतून भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये प्रखर असे  युवा वक्ते तसेच नेतृत्व या माध्यमातून मिळणार आहे व हि एक नवयुवकांसाठी संधी आहे स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी. अटल वक्तृव्य स्पर्धेचे पारितोषीक वितरण भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटनमंत्री श्री.संजयजी कौडगे, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार श्री.कीरण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, प्र.का.स. संताजीराव चालुक्य या मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. अटल वक्तृत्व स्पर्धेचे विजेते प्रथम क्रं. श्री बाजीराव काशीनाथ जाधवर यांना रोख रक्कम ३००१/- रुपये, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले, द्वितीय क्रं.कु.अंबिका ‍विजयकुमार आगळे यांना २००१/- रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले, तृतीय क्रं. श्री.श्रीराम सुधाकर मुंबरे यांना १००१/- रुपये राख रक्कम प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले, तसेच उत्तेजनार्थ  कु.ऋतुजा रावसाहेब मगर व विवेकानंद शिवराम हंगरगे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.

 या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक सचिन लोंढे यांनी केले. परिक्षक म्हणून प्रशांत गुरव व डॉ.कृष्णा तेरकर हे होते. यावेळी प्रमुख पदाधिकारी ॲड.खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, प्रदिप शिंदे, ॲड.नितीन भोसले, सुनिल काकडे, इंद्रजित देवकते, भाजपा महिला जिल्हाध्य नंदाताई पनगुडे, प्रविण शिरसाठे, पांडुरंग लाटे, डॉ.प्रशांत पवार, पिराजी मंजुळे, राहुल काकडे, दाजीप्पा पवार, शेषेराव उंबरे, विनोद निंबाळकर, संदिप इंगळे, ओम नाईकवाडी, प्रितम मुंडे, अमोल पेठे, हिम्मत भोसले, राज नवले, गणेश देशमुख, रोहित देशमुख, पंकज जाधव, विलास सांजेकर, प्र.का.स. मनिषा केंद्र, देवकन्या गाडे, बालाजी जाधव, पुष्पकांत काळाळे, आनंद भालेराव, स्वप्नील नाईकवाडी, सुशांत सोनवणे, ज्ञानेश्वर सुळ, ओंकार देवकते, सागर दंडनाईक, आदित्य इंगळे व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top