उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयात शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण हा गंभीर विषय आहे. भविष्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सेंद्रीय शेती पध्दत ही िकफायतशीर ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय पध्दतीने शेती केल्यास आत्महत्य रोखण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. 

टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर यांच्या वतीने सेंद्रीय शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने एक दिवशीय सेंद्रीय शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सेंद्रीय शेती करणारे तुळजापूर, लोहारा, कळंब, उस्मानाबाद, भुम, उमरगा या तालुक्यातील दीडशे शेतकऱ्यांनी कार्यशाळेत भाग घेतला. कार्याशाळेच्या उद्घाटनपर भाषणात जिल्हा अिधक्षक, कृषी अिधकारी महेश तीर्थकर यांनी शेतातील वाढता खर्च व जोखीम याचा विचार करता भविष्यात सेंद्रीय शेती ही महत्वपुर्ण ठरणार आहे. तर प्राध्यापक रमेश जारे यांनी टाटा सामाजिक संस्था ही कळंब व तुळजापूर तालुक्यात दहा गावामध्ये सेंद्रीय शेतीचे प्रयोग करणार असल्याचे सांगितले. डॉ. निलम यादव यांनी महिलांचा शेतातील वाढता सहभाग लक्षात घेता त्यांना प्रशिक्षीत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पोिलस निरीक्षक काशिद व वैशाली घुगे, कृषी सखी कोळगेताई, लक्ष्मण म्हेत्रे यांनी ही यावेळी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश चादरे यांनी केले. तर आभार आनंद भालेराव यांनी मानले. 

यांची होती उपस्थिती  

या कार्यशाळेस पोलिस उपाधिक्षक कळंब एम.रमेश, रेवणसिध्द लामतुरे, मनोहर दावने, शंकर ठाकरे, राम राठोड यांची उपस्थिती होती.  

 
Top