उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 30 डिसेंबर 2022 रोजी येथील नगर परिषदेतील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये लोकगीत (कलाकार संख्या-10) आणि लोकनृत्य (कलाकार संख्या-20) आदींचा समावेश आहे.

 स्पर्धकांसाठी किंवा कलाकारांसाठी वयोगट 15 ते 29 वर्षे असा राहील. वय दि. 12 जानेवारी 2022 रोजी किमान 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 29 वर्ष असावे. (जन्मतारीख 12 जानेवारी 1994 ते 12 जानेवारी 2008 दरम्यान असावी) कलाकार हा महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक राहील.

 स्पर्धकाने नांव नोंदणी करतांना प्रवेशिकेसोबत आपले आधार कार्ड आणि जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यासाठी शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करताना आपले प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम समिती उस्मानाबाद येथे सादर करावेत. प्रवेश अर्ज सादर करताना सोबत आपला व्हट्सॲप क्रमांक असणे आवश्यक आहे. कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभगी करून घेण्यात येणार नाही. ज्या स्पर्धकाचे अर्ज दि. 29 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत कार्यालयास प्राप्त होतील, त्याच स्पर्धकांना कला सादर करण्याकरीता कार्यालयाच्या वतीने मान्यता देण्यात येईल. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील, त्यावर कोणताही आक्षेप नोंदविता येणार नाही. प्रतिस्पर्धी कलाकारांबाबत काहीही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिधी त्याचवेळी आक्षेप सिद्ध करणे आवश्यक राहील. कलाकारांना कला सादर करतांना कोणत्याही प्रकारची इजा / दु:खापत झाल्यास त्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही.

 लोकगीतामध्ये 10 कलाकार आणि लोकनृत्यात 20 कलाकाराच्या मर्यादेतच कलाकार असणे बंधनकारक आहे. लोकनृत्यासाठी पुर्वध्वनीमुद्रीत (Pre-recorded) टेप अथवा कॅसेट ला परवानगी दिली जाणार नाही. लोकनृत्याचे गीत चित्रपटबाह्य असावे. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक - युवती यांना सहभागी होता येणार नाही.

 जिल्ह्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवक युवतींनी उपरोक्त युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी दि.29 डिसेंबर 2022 पर्यत आपली प्रवेशिका वयाच्या आणि रहिवाशी दाखल्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत अथवा ( संपर्क क्रमांक- 9923531423 कैलास लटके, क्रीडा अधिकारी ) ई-मेल द्वारा (ई-मेल-distsports.osmanabad@gmail.com) विहीत वेळेत पाठवावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.


 
Top