तुळजापूर / प्रतिनिधी-

   तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संत गाडगेबाबा पॅनलच्या नवनिर्वाचित ग्राप सदस्य व पॅनल प्रमुखांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला .

या पॅनलचे सात उमेदवार निवडून आले व बहुमत प्राप्त केले आहे . त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल मुस्लिम बांधवांनी नवनिर्वाचित ग्राप सदस्य तथा पॅनल प्रमुख शरद नरवडे , पंडित कबाडे , महेश्वर बोंगरगे , नागनाथ खंदारे , ताराबाई पवार , सुवर्णा पाटील , चतुराबाई जवळगे , तर पॅनल प्रमुख महादेव सालगे , तुकाराम बोंगरगे , ब्रह्मानंद कापसे , अनिल पवार , प्रवीण पवार , गौराबाई सालगे , शेकापा सालगे , हरी पवार , विकास सांगवे , मदन कबाडे , सह पॅनल प्रमुखाचा देखील सत्कार करण्यात आला . सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी चांद शेख , इस्माईल शेख , सलामत टिनवाले , सिकंदर शेख यांनी परिश्रम घेतले आहेत .

 
Top