तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तुळजापूर - तालुक्यातील चिवरी येथील देवस्थान महालक्ष्मी देवी देवस्यान कडे जाणाऱ्या  रस्त्यांची अवस्था  बिकट अवस्था झाली आहे. याचा ञास भाविकांना होत असल्याने हा रस्ता त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

 सदर रस्ता हा दोन तिन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. संबंधीत बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दूरुस्ती बाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.यामुळे देविभक्तांनमधुन  संताप व्यक्त केला जात आहे. तुळजापुर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी  चिवरी येथील महालक्ष्मी देवीच्या देवस्थान पासुन ते नळदुर्ग रोड येथील चिवरी पाटी पर्यत रोड रस्ता तात्काळ दुरूस्त  करण्याकामी लक्ष घालावे , अशी  मागणी होत आहे.  तरी संंबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.


 
Top