उस्मानाबाद  /प्रतिनिधी -

मागील पंधरावर्षांपासून शहरात दरवर्षी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून साजरा केला जातो. रविवारी झालेल्या बैठकीत डॉ. देशमुख यांना समितीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले.

 जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी १२ जानेवारीपासून समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. राजमाता जिजाऊ पुरस्कार, लोकराजा राजर्षी शाहु समाजभूषण पुरस्कार, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे क्रीडाभुषण पुरस्कार, कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार, मान्यवरांची व्याख्याने, स्त्री रुग्णालय येथे विविध साहित्य वाटप तसेच भव्य रक्तदान शिबीर देखील या निमित्ताने आयोजित केले जाते. यावर्षी देखील समितीच्यावतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत डॉ.वसुधा दापके देशमुख यांची अध्यक्ष, कार्याध्यक्षपदी सौरभ देशमुख, तर सचिवपदी महेश उंबरे यांची निवड करण्यात आली. पुढील कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी युवराजभैय्या राजेनिंबाळकर, अमितभैय्या शिंदे, प्रा.भालचंद्र जाधव, रवी मुंडे, उमेश राजेनिंबाळकर, रोहित बागल, मधुकर अनभुले, रवी निंबाळकर, अभिषेक बागल, गणेश उंबरे, डॉ.सुभाष वाघ, अभिजीत काकडे, विक्रमभैय्या पाटील, खंडु राऊत, शरद पडवळ, सुधाकर पवार, बंटी मुंडे, गौरव बागल, विष्णु यमपुरे, ओंकार जगदाळे,

बाळासाहेब केदार, मनोज सरडे, अक्षय गोरे यांच्यासह समितीचे सदस्य व शिवप्रेमी उपस्थित होते.

 
Top