उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील प्रभाग चारमधील बाळासाहेब ठाकरेनगर येथे ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा व जनकल्याण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (बापू) साळुंके यांनी हा अनोखा उपक्रम बुधवार, 14 डिसेंबर रोजी आयोजित केला असून जनकल्याण शिबिराचा प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

 प्रभाग चारमधील नागरी समस्यांचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर त्यांनी जनकल्याण शिबिर आणि सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेह मेळाव्याचे बुधवारी आयोजन केले आहे. जनकल्याण शिबिर हे सकाळी 11 ते 5 या वेळेत तर ज्येष्ठ नागरिक मेळावा सायंकाळी 4 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.  जनकल्याण शिबिरामध्ये संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेसाठी पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नोंदणी करण्यात येणार आहे. या स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी खास स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आलेले आहे.

 शिवसेनेचे धाराशिव उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (बापू) साळुंके  विविध सामाजिक समस्या, गरजूंच्या अडीअडचणी, समस्यांसाठी नेहमीच धावून जातात. कोणत्याही प्रसंगात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊन सामाजिक प्रश्न सोडविणारे धाडसी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

 या शिबिरासाठी गरजू ज्येष्ठ नागरिकांनी दारिद्—य रेषेखालील पुरावा, वयाचा दाखला, मिळकत प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधिकार्‍यांचे अकार्यक्षमतेचे प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे असे प्रशांत साळुंके यांनी कळविले आहे.

 
Top