उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हाधिकारी यांनी आज शेतकऱ्यांना कमी जास्त पिकविमा मिळत असल्याबद्दल तक्रार निवारण समितीची व कृषी,विमा कंपनी अिधकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार यांना ही माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर हे पण या बैठकीस आले. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठकीस का बोलावले नाही,  यावर जिल्हाधिकारी ओम्बांसे यांनी ही फक्त अिधकाऱ्यांची बैठक आहे, असे सांगत असतानाच आमदार राणा जगजितसिंह पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात एकमेकांना बोलण्यावरून बाचाबाची झाली.  

उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांना २०२२ चा पीकविम्याचे वाटप सध्या सुरू आहे. एका शेतकऱ्यांला २५ हजार रुपये  पीक विमा मिळाला तर त्याच्या शेजारील शेतकऱ्यांला केवळ १९०० रुपये मिळाले हा प्रकार अनेक शेतकऱ्यांबाबत घडल्यामुळे अिधकाऱ्यांची बैठक सभागृहात चालू असतानाच संतप्त शेतकऱ्यांनी बाहेर घोषणाबाजी सुरू केली होती. ही सर्व माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांंना मिळताच ते पण जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात आले. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पीक विमा िमळताना अशी तफावत का असा प्रश्न उपस्थित करून कांही लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना तक्रारी अर्ज व पंचनामा सोबत घेऊन या असे आवाहन केले आहे. परंतू पंचनामेच खुद्द कृषी विभागाकडेच नाहीत मग शेतकऱ्यांकडे कसे असतील. पंचनामे करताना शेतीची ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचे दाखवले आहे. मात्र बाधित क्षेत्र ज्यांनी पैसे  दिले त्यांचे जास्त दाखविण्यात आले. तर ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांचे कमी क्षेत्र दाखविण्यात आले आहे. तरी ही तुम्ही या बैठकीला सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीला बोलाविता आम्हाला का बोलावले नाही  असा प्रश्न खासदार ओमराजे हे  जिल्हाधिकारी ओम्बासे यांना विचारत असतानाच  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बाळा असा शब्दप्रयोग करताच ओमराजे यांनी संतापून तू नीट बोल रहे असे  म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर व राणाजगजितसिंह पाटील यांच्यात आरे -तुरे-ची भाषा होत शाब्दिक वाद झाला.


कामधंदा सोडून शेतकऱ्याला का बोलावले-खा.ओमराजे

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आवाहन करून शेतऱ्यांनी पंचनामे व तक्रारी अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात यावे, असे आवाहन केले होते. असे सांगून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  ही शेतकऱ्यांची हेळसांड असून शेतीचे केलेले पंचनामे कृषी विभागाकडे नाहीत तर शेतकऱ्यांना कोठून आणायला सांगता. शेतकऱ्यांना २०२२ चा मिळणाऱ्या पिकविम्यामध्ये प्रचंड तफावत आहे.  बांधाशेजारील शेतकऱ्याला ५० हजार रुपये मिळाले. तर शेजारील शेतकऱ्याला २००० मिळाले. अशा प्रकारची प्रचंड प्रमाणात तफावत आहे.प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन कोणाला किती पिक विमा मिळाला यांच्या याद्या लावा व सोशल ओडीट करा  असे सांगून    पिकविमा मिळवुन दिल्याचे श्रेय घेण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल आमदार राणाजगजितसिंह पाटील करत  असल्याचा आरोप ही  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 


कांगावा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय देने महत्वाचे -

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बैठकीतील बाचाबाचीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कांगावा करून आपशब्द वापरने मला आवडत नाही. असे सांगून शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अिधकाऱ्यांची आज खास बैठक जिल्हाधिकारी ओम्बासे यांच्या उपस्थिती मध्ये   विमा कंपनी व , कृषी अिधकाऱ्यांसमवेत बोलावली होती. या बैठकीत शेतकऱ्यांना ही बोलाविले होते.  शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पिक विम्यात नेमक्या काय चुका आहेत त्या दुरूस्त करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. असे   आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

 
Top