उस्मानाबाद/प्रतिनिधी
भाजपला सर्व पक्ष संपवायचे आहेत आणि अध्यक्षीय लोकशाही आणायची आहे. त्यासाठीच लोकपालचे नाटक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये माईक ओढणे, बोलण्यासाठी चिठ्ठी देणे हे सर्व मराठा समाजातील व्यक्तीमध्ये निर्णय क्षमता नाही हे दाखविण्याचे प्रयत्न भाजपने केले असून मुख्यमंत्र्यांना डॅमेज करण्याचाही प्रयत्न केला, अशी घणाघाती टिका   शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जाहीर  केली.
श्रीमती अंधारे उस्मानाबादेतील नेहरू चौकात मंगळवारी (दि.6) आयोजीत केलेल्या महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टिका केली. आ.राणा पाटील यांचेवरही तोंडसुख घेतले. यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील, माजी आ.ज्ञानेश्वर पाटील, जोती ठाकरे, मकरंदराजे निंबाळकर , शंकरराव बोरकर, सोमनाथ गुरव, अक्षय ढोबळे, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमती अंधारे म्हणाल्या  उस्मानाबाद-धाराशिव म्हटले जाते. उस्मानाबादचे विलगीकरण करून नीवन लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. दोन जिल्हे निर्माण केले. उस्मानाबादेतून लातूरची निर्मिती झाली. लातूरने प्रचंड प्रगती केली. मात्र उस्मानाबाद आहे तीथेच आहे.उस्मानाबादेत साडेआठ नंतर सन्नाटा जाणवतो मराठी माणसाचे हित जोपासण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनामुळे शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेना वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करते. मुंबईत मराठी माणसांचा टक्का वाढवा यासाठी प्रयत्न करते मात्र तीथे महाराष्ट्रच दिसत नाही.मराठी माणुस हद्दपवार होतोच याला आळा घालण्यासाठी शिवसेनेने मोठा लढा दिला. भाषिक प्रांत रचनेवेळी गुजरात व महाराष्ट्रात अपवाद करण्यात आले. याला मराठी माणसांनी विरोध केला.
भाजपवर टिका करताना गिरीष महाजन यांनी भाजप मेळाव्यासाठी झालेला खर्च कोढुन केला याची माहिती देणयाची मागणी श्रीमती अंधारे यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टिका करताना त्या पक्षाने नावाप्रमाणे महाराष्ट हिताचे बघावे असा टोला लगावला.
उमरग्याचे माजी खा.रवी गायकवाड यांना आमदार, खासदार केले तरी त्यांनी गद्ारी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांनी दिलीप देशमुख यांचे विरूध्दचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. एवढी बेईमानी करूनही त्यांना पक्षाने बरेच दिले. अशांना बोलण्याचा अधिकार नाही, असे श्रीमती अंधारे म्हणाल्या. यावेळी त्यांनी मिंधे गटात गेल्यानंतर अनेकांच्या चौकशा कशा काय बंद झाल्या, असे म्हणुन भाजप सुडबुध्द्ीचे राजकारण करत आहे. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर ही टिका केली. 
मकरंदराजे म्हणाले 
मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केलेल्या टिके संदर्भात मकरंदराजे निंबाळकर यांनी निंबाळकर परिवाराला दान घेण्याची सवय नाही, दान देण्याची सवय आहे, असे सांगून त्यांनी बाजीराव पाटील, फंड परिवार, शहरातील विकासात्मक कामाला स्थगिती या संदर्भात माहिती दिली. 
अामदार कैलास पाटील म्हणाले
उध्दव ठाकरे यांचे सरकार असताना पीक विमा, अनुदान या संदर्भात कृषी मंत्री, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी, अशी मागणी अामदार राणाजगजितसिंह पाटील वारंवार करीत होते. आता तर त्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान मिळण्यासाठी का बैठक घेत नाहीत. विमा कंपन्या सध्या लुट करीत आहेत, असे सांगून शहरातील विकास कामांना व या मतदार संघातील विकास कामांना ठाकरे सरकार ने भरभरून मदत केली.परंतू त्यापैकी अनेक विकास कामावर या सरकार ने स्थगिती आणली आहे. 
खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले
ग्रामंपचायतच्या राजकारणात जे घडले नाही, ते राज्याच्या राजकारणात घडले. या लोकांच्या अब्रुचे लक्तरे पार वेशीवर टांगले आहेत. लोकशाही जीवंत ठेवायची असेल तर उद्याची निवडणुक फार महत्वाची आहे. कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्यांचे मृतदेह गंगेमध्ये वाहून जात होते. परंतू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र राज्यातील जनतेची, कोरोनाग्रस्तांची जीव लावून काळजी घेत होते. गेल्या ४० वर्षांत दरिद्यी जिल्हयात उस्मानाबाद तीसऱ्या स्थानावर आहे. तर श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये त्यावेळेस डॉ.पद्मसिंह पाटील यांचे नाव तीसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी ओमराजे यांनी समारा-समोर जाहीर सभा घेऊन विकासकामावरील प्रश्नांला उत्तरे द्यावे, असे आव्हान दिले. 


 
Top