उस्मानाबाद/प्रतिनिधी

िशवसेना राजकीय पक्ष होईल का नाही, माहीत नसताना ही शिवसेनेचे निष्ठापुर्वक काम केले. रात्री बे रात्री पक्षाचे आलेले आदेश पाळत गेलो. १९९५ शिवसेनेची सत्ता आली. त्यानंतर २०१९ ला शिवसेनेची परत सत्ता आली. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी निष्ठवंत कार्यकर्त्यांची आठवण ठेवून योग्य ती संधी देऊन सन्मान केला. परंतू आमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना शिवसेनेने ना संधी दिली ना सन्मान केला. ना आमची आठवण ठेवली, अशी खंत बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेलेले ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अिनल खोचरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

आपण शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना का सोडली. या संदर्भात माहिती देण्यासाठी खोचरे यांनी पत्रकार परिषद बुधवार दि. ७ डिसंेबर रोजी बोलावली होती.यावेळी बोलताना खोचरे यांनी  शिवसेनेची सत्ता असताना आपण वैधानिक पदाची मागणी करत होतो. परंतू प्रत्येकवेळेस समजावून परत पाठविले जात होते. त्यातच जुन्या- जाणत्या शिवसैनिकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्यासाठी आग्रह होता. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सुषमाताई अंधारेंच्या प्रबोधन यात्रेसंदर्भात बोलताना तानाजी सावंत व चौगुले यांच्यावर टिका करण्याचा सुषमा अंधारे  यांना काय अिधकार आहे. त्यांनी काय योगदान दिले आहे. हे  पहाणे आवश्यक आहे, असे सांगत आमचे प्रबोधन करण्याची गरज नाही, मुळातच आम्ही भगव्या रक्ताचे आहोत, असे सांगितले. यावेळी त्यांनी दिलीप जावळे सारखे निष्ठांवत शिवसैनिक वाऱ्यावर सोडले होते. परंतू बाळासाहेबांची शिवसेनेचे असलेले पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मदत केल्याचे ही त्यांनी सांगितले. 

 
Top