उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

  उस्मानाबाद शहरात  एका 3 वर्षाच्या अल्पवयीन चिमुरडीवर 13 वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलगी घरात खेळण्यासाठी आली असता शेजारी राहणाऱ्या आरोपीने बलात्कार केला आहे.

 मुलीने सांगीतल्यावर हा प्रकार उघड झाल्यानंतर पालकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.आरोपी सुद्धा अल्पवयीन असून पोलिस तपास करीत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे व सर्वांना पालक म्हणून विचार करायला भाग पाडले आहे.

 
Top