उस्मानाबाद /प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील कोंबडवाडी शिवारातील शेत गट नं.102 मधील बोरीच्या झाडास लालु आण्णा या इसमाने दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12.30 वा.चे सुमारास गळफास घेतल्याने मयत झाला आहे.

मयत इसम लालु आणा (पूर्ण नाव माहित नाही), वय अंदाजे 45 वर्षे, रंग सावळा, केस अर्धवट काळे-पांढरे, चेहरा उभट, नाक सरळ, दाढी पांढरी व काढलेली, मिशी बारीक काळी-पांढरी, उंची 5.5 फूट, शरीर बांधा सडपातळ, अंगात शर्ट-निळसर व पॅन्ट काळी या प्रकारे वर्णन आहे.

 तरी या वर्णनाच्या इसमाबाबत काही माहिती असल्यास पोलिस ठाणे ढोकी येथे दुरध्वनी क्र.02472-232033, सपोनि जगदीश राऊत मो.9545555550, पोउपनि गाडे मो.9623458664 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ढोकी पोलिस स्टेशनचे पोलिस उप-निरिक्षक बी.वाय.गाडे यांनी केले आहे.


 
Top