मुंबई /प्रतिनिधी-

 माता सुरक्षित तर घर सुरक्षित   या अभियानात मधुमेह रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी मधुमेह मुक्त महाराष्ट्र हा प्रकल्प हाती घेतला, हा प्रकल्प हाती घेताना मधुमेह मुक्त राज्य करण्यासाठी लागणारी उच्चप्रतीची औषधे, वैद्यकीय उपकरणे आणी पायाभूत सुविधा ह्या डेन्मार्क शासनाच्या मदतीने करणार असल्याचे सांगितले, या करिता आज डेन्मार्काचे भारतीय राजदूत फ्रेडी स्वान यांच्याशी प्राथमिक स्तरावर चर्चा केली. या चर्चेत पुढील महिन्यात डिसेंबर मध्ये या संबंधित महाराष्ट्र राज्य आणी डेन्मार्क सरकार यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. 

 मुंबई येथे आज पार पडलेल्या बैठकीत डेन्मार्क चे भारतीय राजदूत फ्रेडी स्वान,डेन्मार्क चे उद्योग मंत्री सोरेन कैनिक,करकेडा,आनंद त्रिपाठी, रूरल डिजीटल हेल्थ अँड फायनान्सचे डाॅ.सतिश तागडे यांच्या शिष्टमंडळाशी महाराष्ट्र राज्यात दोन महिन्यात झालेल्या चार कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीत आढळून आलेल्या विविध आजारा विषयी सविस्तर चर्चा झाली, यात प्रामुख्याने तीस वर्षावरील महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले, हे फक्त महिलां मध्येच नाहीतर पुरूषांमध्ये मोठ्याप्रमाणात आहे, त्यामुळेच मधुमेह मुक्त महाराष्ट्र हा प्रकल्प आपण हाती घेऊन या करिता डेन्मार्क सरकारने उच्चप्रतीची औषधे ,अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणी  पायाभूत सुविधांसाठी देवाणघेवाण करावी अशा आशयाची चर्चा झाली. या चर्चेतून पुढील महिन्यात डिसेंबर मध्ये महाराष्ट्र राज्य आणी डेन्मार्क सरकार यांच्यात एक सामंजस्य करार होऊन या तीनही क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार असे आरोग्य मंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

 
Top