उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने परिसर मुलाखतीचे आयोजन दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. 

यासाठी आय.सी.आय.सी.आय बँक, महिंद्रा कोटक बँक, एच.डी.बी. फायनान्स आणि  आय.बी.पी या चार बँकाचे अधिकारी मुलाखती घेण्यासाठी येणार आहेत. यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.  महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांबरोबरच इतर विद्यार्थ्यांना व परिसरातील सर्व पदवीधर उमेदवारांना मुलाखतीमध्ये सहभागी होता येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील व परिसरातील नोकरीची आवश्यकता असणाऱ्या उमेदवारांनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता महाविद्यालयाच्या परिसरात मूळ कागदपत्रासह हजर राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.

 
Top