लोहारा/प्रतिनिधी

नवीन मतदार नोंदणी करिता १० नोव्हेंबरला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी १ जानेवारी २०२३ ला १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या युवकांनी या मतदार नोंदणीमध्ये नावे नोंदवावीत असे आवाहन तहसिलदार संतोष रुईकर यांनी केले आहे.

 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार संतोष रुईकर यांनी ग्रामीण व शहरी भागामध्ये ९ नोव्हेंबरपासून नवीन मतदार नोंदणी सुरू झाली आहे. त्याकरीता दि.१० नोव्हेंबर रोजी लोहारा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. त्याबाबत गटविकास अधिकारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.१ जानेवारी २०२३ ला १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या युवकांनी या मतदार नोंदणीमध्ये नावे नोंदवावीत असे आवाहन तहसिलदार संतोष रुईकर यांनी  केले आहे.यावेळी लोहारा तालुक्यातील दिव्यांगांनी मतदार याद्यांमध्ये आपली नोंदणी करून घ्यावी.दि.९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत लोहारा तालुक्यातील नवीन मतदार नाव नोंदणी कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर या नाव नोंदणीवर हरकती मागवण्यात येतील.५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.मतदार यादीत मतदारांची नावे आधार कार्डशी लिंकिंग करण्याचा कार्यक्रम देखील याच दरम्यान होणार आहे.त्यामुळे मतदारांनी मतदान कार्डशी आधार लिंकिंग करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.शंभर टक्के मतदान नोंदणी व नावे दुरुस्ती करण्यावर भर राहणार असून फॉर्म क्रमांक ६ व ७ यामध्ये बदल झाला असून मतदारांनी त्यानुसार अर्ज करावेत असेही तहसिलदार संतोष रुईकर यांनी सांगितले.

 
Top