तुळजापूर/प्रतिनिधी

 तिर्थक्षेञ तुळजापूरात   शासकीय जागेवर  उभ्या   असलेल्या वाहनांची पार्किंग वसुली करत  असल्याने हे चाललेले प्रकार त्वरीत थांबविण्याची मागणी सामाजिक कार्यकते रविंद्र सांळुके  यांना  जिल्हाधिकारी   डॉ.सचिन ओंबासे यांना निवेदन देवुन केली आहे.

 उस्मानाबाद रोड दोन्ही बाजू , नगर परिषदेच्या वाचनालय परिसर,  तुळजापूर खुर्द रोड येथील जागेत व न.प शाळा क्रमांक दोन कोर्टा लगत  तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अभियांत्रिकी महाविद्यालय व सैनिकी विद्यालय येथील मैदानात असलेल्या परिसरात  थांबवलेल्या   वाहनांकडुन पार्किंग वसुली केली जात आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून होणारी भाविकांची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. 


 
Top