लोहारा/प्रतिनिधी

महाराष्ट्र माळी समाज महासंघ व महात्मा फुले युवा मंच यांच्यावतीने शहरातील शिवनगर येथे दि.28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांची स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार शहरातील माजी नगरसेवक श्रीनिवास माळी यांना मिळाल्याबद्दल माळी समाज महासंघ व महात्मा फुले युवा मंच यांच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक अविनाश माळी, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, सुग्रीव क्षीरसागर, अशोक माळी, पत्रकार निळकंठ कांबळे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, राजेंद्र माळी, संजय काटे, संतोष क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, अशोक काटे, शरण फुलसुंदर, ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्राचार्य शहाजी जाधव, सकलेन शेख, सोमनाथ भोजने, संदिप माळी, बळी रोडगे, लक्ष्मण रोडगे, शंकर माळी, सोमनाथ क्षीरसागर, सतिश माळी, अमोल माळी, संजय दरेकर, बालाजी माळी, दिनेश माळी, गणेश माळी, बंटी फुलसुंदर, यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top