उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दि. 26 नोव्हेंबर,2022 संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दि. 06 डिसेंबर,2022 पर्यंत समता पर्व निमित्त जिल्ह्यात पुढीलप्रमाणे कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

 26नोव्हेंबर 2022 रोजी Walk For Constution, संविधान रॅली, प्रभात फेरी. संविधानाचे वाचन व तज्ञ व्यक्तिकडून मागदर्शन. जिल्हयातील सर्व शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, समाजकार्य महाविदयालय, शाहु फुले आंबेडकर निवासी, अनिवासी आश्रमशाळा तसेच विजाभज आश्रमशाळा यांना Walk For Constution, संविधान रॅली, प्रभात फेरी. संविधानाचे वाचन व तज्ञ व्यक्तिकडून संविधानाबाबत मार्गदर्शन.

 27 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हयातील सर्व शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, समाजकार्य महाविदयालय, शाहु फुले आंबेडकर निवासी, अनिवासी आश्रमशाळा तसेच विजाभज आश्रमशाळा येथे निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, लेखी परिक्षा, वकृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रम.

 28 नोव्हेंबर 2022 रोजी स्थानिक महाविद्यालयामध्ये  संविधान विषयक व्याख्यान. 29 नोंव्हेबर 2022 रोजी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय,उस्मानाबाद येथे नवी दिशा या विषयावर कार्यशाळा. 30 नोव्हेंबर 2022 संविधान या विषयावरील भितीपत्रक, पोस्टर्स, बॅनर इत्यादी बाबत जिल्हा स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन. अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारीवर्ग यांची अनुसूचित जाती उत्थान दशा आणि दिशा या विषयावर कार्यशाळा.

 1 डिसेंबर 2022 रोजी जिल्हास्तरावर युवागटांची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 02 डिसेंबर 2022 रोजी जिल्हयातील व तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीना भेटी. 03 डिसेंबर 2022 रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीराचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. सर्व तालुकास्तरावर योजनांची माहितीची कार्यशाळा तसेच शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा मध्ये विद्यार्थ्यासोबत संवाद कार्यक्रम. 04 डिसेंबर 2022 रोजी जेष्ठ नागरीक, दिव्यांग, तृतियपंथी व वृध्द यांच्यासाठी माहितीची कार्यशाळा. 05 डिसेंबर 2022 रोजी अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा,उस्मानाबाद येथे संविधानाबाबत सांस्कृतिक कार्यक्रम.

 06 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन, सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप, बक्षिस वितरण व समता पर्वाचा समारोप कार्यक्रमाचे आयोजन. या प्रमाणे कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती जाणून घेवून त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ पोहचविण्याकरिता सहकार्य करावे, असे अहवान सहायक समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.


 
Top