उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि अन्य शासकीय विभागांच्या  संयुक्त विद्यमाने “जागतिक महिला हिंसाचार प्रतिबंध दिवसाच्या” पार्श्वभूमीवर दि. 25 नोव्हेंबर  ते दि. 23 डिसेंबर 2022 या कालावधीत राष्ट्रीय लिंगभाव मोहिमेचे (National Gender Campaign) आयोजन संपूर्ण देशात करण्यात येत आहे.

 या मोहिमेचे उद्घाटन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते दि. 25 नोव्हेंबर 2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी राज्यमंत्री ग्रामीण विकास साध्वी निरंजन ज्योती यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उदघाटन कार्यक्रमात फग्गन सिंग कुलस्ते, राज्यमंत्री, ग्रामीण विकास हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. या मोहिमेंतर्गत केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग आणि सामाजिक संस्था यांच्या समन्वयाने समाजात महिलांच्या हिंसा विरहित वातावरण तयार करण्याच्या उद्दिष्टाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये गाव फेरी, रॅली, घोषवाक्य, व्हिडीओ फिल्म्स, रांगोळी आदींच्या माध्यमातून स्त्रीभ्रृण हत्या, बालविवाह, महिलांवरील हिंसाचार प्रतिबंधात्मक उपाययोजना, मुलींचे शिक्षण, आरोग्य, हुंडाबंदी, महिलांचे हक्क आणि अधिकार आदी विषयांवर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेले स्वयंसहाय्यता समुह, ग्रामसंघ आणि प्रभागसंघांमार्फत प्रबोधन आणि जाणीव जागृती करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय लिंगभाव मोहिमेचा एक भाग म्हणून देशभरात  160 लिंगभाव संसाधन केंद्रांचे (Gender Resource Center – GRC) उदघाटन करण्यात आले. ज्यामध्ये महाराष्ट्रातील चार केंद्रांचा समावेश असून त्यापैकी एक केंद्र उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या तिरंगा महिला प्रभागसंघ, बेंबळी या प्रभागसंघांतर्गत “नवी चेतना लिंगभाव संसाधन केंद्र” म्हणून सुरु करण्यात आले आहे.  भेदभावाच्या समस्या ओळखून त्या स्विकारणे किंवा मान्य करणे आणि समाज प्रबोधन करून महिलांचे हक्क आणि अधिकार सुनिश्चित करणे आणि सामुहिक शक्तीच्या जोरावर उपेक्षितांना संरक्षण आणि सुरक्षा मिळवून देण्यासाठी लिंगभाव संसाधन केंद्र काम करणार आहे. सदरील केंद्र जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीत स्थापन करण्यात आले असून त्याचे उदघाटन ग्राम पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले आणि बळीराम निपाणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी समाज कल्याण, शिक्षण, पोलीस, माविम या विभागांचे प्रतिनिधी तसेच तिरंगा महिला प्रभागसंघ बेंबळी यांच्या कार्यकारी समिती सदस्य, सुकाणू समिती सदस्य  आणि तालुक्यातील इतर 11 प्रभागसंघांचे पदाधिकारी, प्रभागसंघ व्यवस्थापक आणि प्रेरिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेदचे जिल्हा अभियान संचालक राहूल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली आणि सहजिल्हा अभियान संचालक तथा प्रकल्प संचालक उमेद प्रांजल शिंदे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली अल्ताफ जिकरे, समाधान जोगदंड, पूजा घोगरे, अभिजित पडवळ, नागेश काकडे आणि अमोल खवले यांनी परिश्रम घेतले.

 
Top