उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे एम.ए.अर्थशास्त्र भाग दोन मधील कु.योगिनी उमाकांत साळुंखे ही विद्यार्थिनी केंद्रीय क्रीडा महोत्सव नाशिक येथे पंधराशे मीटर धावणे यामध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.तसेच पाच हजार मीटर मध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.व ऑल इंडिया युनिव्हर्सिटी अश्वमेघ या स्पर्धेसाठी योगिनी साळुंखे हिची निवड झालेली आहे.

  कुमारी योगिनी उमाकांत साळुंखे हिला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्रप्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक डॉ. डी.एम. शिंदे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.रेणके, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. जावळे यांचे मार्गदर्शन लाभले.

  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, डॉ. डी.एम. शिंदे यांनी कु.योगिनी साळुंखे हिचे अभिनंदन केले. आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी महाविद्यालयाचे प्रबंधक श्री दिलीप लोकरे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सहाय्यक ज्ञानेश्वर बारवकर डॉक्टर लक्ष्मण भरगंडे डॉक्टर देविदास इंगळे उपस्थित होते.


 
Top