उमरगा / प्रतिनिधी-

 खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल शिवराळ भाषेत अक्षेपार्य वक्तव्य केल्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरगा येथील पक्ष कार्यालयासमोर जाहीर निषेध करत जोडे मारा आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि .८ रोजी करण्यात आले .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला. खासदार सुप्रियाताई सुळे बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल निषेध केला जात असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्याहि आक्रमक झालेले पहायला मिळाल्या . यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांनी, खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राचे भूषण आहेत. सलग सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळविणार्‍या देशाच्या त्या एकमेव खासदार आहेत अशा व्यक्तीबद्दल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. येणाऱ्या निवडणूकीत सत्तार यांचा शिवतारे होईल असे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी प्रदेश युवक सचिव दिग्विजय शिंदे म्हणाले की, ५० खोक्याचा विषय मोठ्यापासून लहानांपर्यंत चर्चिला जात आहे. कुठे तरी सत्तेची गुर्मी दिसत असून महिलांच्या बाबतीत सत्ताधारी मंत्र्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहे. देशात महिला धोरण राबविण्यात पवार साहेब यांचा पुढाकार होता, त्यामुळे महिलांना आरक्षण मिळाले त्यांच्या कन्येबद्दल खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केल्यामुळे सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा चुकीचे पडसाद उमटून कायदा अन सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा दिला.

    राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र महिलांचा आदर करीत आला आहे. कृषीमंत्री सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही.राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्रासाठी, आणि महिला भगिनींसाठी निंदनीय आहे.  यावेळी तालुका अध्यक्ष संजय पवार, प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनिता पावशेरे, युवक तालुका अध्यक्ष शमशोद्दीन जमादार, तालुका कार्याध्यक्ष शंतनू  सगर, युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे ,शहराध्यक्ष खाजा मुजावर , सरचिटणीस धीरज बेळंबकर, डॉक्टर सेल शहराध्यक्ष डॉ .फरीद अत्तार, शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण , महिला तालुका कार्याध्यक्ष भाग्यश्री रणदिवे,साधना सलगरे , संगीता सलगरे , सविता पवार ,   कुमार थिटे ,  रणजीत बिराजदार, प्रभाकर माने, रूपाली सोनकवडे , ईश्वर सोनकवडे, ज्योती राजपूत, रेखा सुरवसे, गीता सुरवसे ,सुनंदा रणखांब ,राजश्री सूर्यवंशी ,विद्या मारकड, आनंद पाटील, गोपाळ घोडके, मंगेश गायकवाड, रोहित शिंदे, अंकुश कांबळे , पिंटु कलशेट्टी आदीसह मोठ्या संख्येने युवक व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या .


 
Top