उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील महत्त्वाचे गाव असणारे भोसा गावाचा रस्ता येत्या 48 तासात दुरुस्त करून एसटी सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी व जि.प.मुख्यािधकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मागणी मान्य न झाल्यास   तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास प्रशासन स्वतः जबाबदार राहील, असा इशारा ही देण्यात आला आहे. 

 यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहित  खलसे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष  मोरे, जिल्हा संपर्कप्रमुख निखिल  चांदणे , लहुजी शक्ती सेनेचे मुकेश   शिंदे, विशाल  कसबे हे उपस्थित होते.


 
Top